शेतकरी आधार संमेलनाचा मंडप कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:26 PM2017-09-24T15:26:20+5:302017-09-24T15:34:03+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या शेतकरी आधार संमेलनाचा भव्य मंडप शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ रात्री मंडपात कुणीही नसल्याने पुढील जीवीतहानी टळल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मंडप उभारण्याचे काम केले आहे.
राहुरी: राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असलेल्या शेतकरी आधार संमेलनाचा भव्य मंडप शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कोसळला़ रात्री मंडपात कुणीही नसल्याने पुढील जीवीतहानी टळल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी मंडप उभारण्याचे काम केले आहे. सोमवारी सकाळी १० वाजता पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे़
क्रीडा संकुलामध्ये गेल्या चार दिवसांपासून मंडप उभारणीचे काम सुरू होते़ मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे मंडपाच्या बल्ल्या खचल्या़ त्यामुळे ताण आल्याने मंडप जमिनीवर कोसळला़ मंडप कोसळल्याचे वृत्त समजताच अभियंता मिलिंद डोके यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ अहमदनगर येथील मंडप ठेकेदाराने मंडप बांधणीचे पुन्हा काम हाती घेतले़ पुन्हा घटना घडू नये यादृष्टीने मंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे़
मोडलेले बांबू,पत्रे बाजूला करण्यात आले आहेत.स्टेजसमोर मंडप उभारण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे़ कदाचित पाऊस आल्यास कार्यक्रम क्रीडा संकुलात घेण्याचीही तयारी प्रशासनाने ठरविली आहे़ किसान आधार संमेलनासाठी राज्यभरातून शेतकरी हजेरी लावणार आहेत. संमेलनात तेलबिया, कडधान्य, तृणधान्य, चारा व नगदी विविध ३० पिकांचे १०१ वाण, १२ भाजीपाला वाण, १४ भाजीपाला पिकांचे २८ वाणांचे प्रात्यक्षिक शेतकºयांना पाहता येतील, असे कुलगुरू डॉ़ के. पी. विश्वनाथा यांनी सांगितले़
१०० दालनांमध्ये विविध विषयावर प्रदर्शन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे़ शास्त्रज्ञ व प्रगतशील शेतक-यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे़ २९ सप्टेंबर रोजी संमेलनाची सांगता होणार आहे़
- विद्यापीठाच्या प्रांगणात मंडप उभारण्याचे काम सुरू होते़ पावसामुळे मंडप खचल्यामुळे कोसळला़ कोणत्याही प्रकारे जीवीतहानी झालेली नाही़ पर्यायी मंडप उभारण्याचे काम सुरू असून रविवारी रात्री दहा वाजेपर्र्यंत मंडपाचे काम पूर्ण होणार आहे़ जुना मंडप काढून टाकण्यात आला असून टुरूंगाईन पध्दतीने नव्याने मंडप उभारण्यात आला आहे़ -मिलिंद डोके, अभियंता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ.