शेतकरी प्रशिक्षण वर्ग संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:36 AM2021-02-18T04:36:35+5:302021-02-18T04:36:35+5:30
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत जमिनीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरीक्षण करून खतांचा संतुलित वापर ...
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आजच्या परिस्थितीत जमिनीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीपरीक्षण करून खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. यावेळी भरमसाट खतांचा वापर केल्याने होणारे नुकसान यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व शेतकरी बांधवांच्या शंकांचे निरसन केले. मातीपरीक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन व मदत केली जाईल, असे तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे यांनी सांगितले.
कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे, सहाय्यक कृषी अधिकारी बाळासाहेब सूळ, आकाश गोरे, बिरू केसकर, शिवप्रसाद कोहोकडे, कैलास मकासरे, मंगेश बनकर व भीमराज गडधे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आरडगाव येथे सुनील मोरे, बाबासाहेब जाधव, ज्ञानेश्वर काळे, कुशाबापू ढेरे, मच्छिंद्र भुसारे, अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब म्हसे, योगेश वाघ, संजय म्हसे, चिमाजी डोईफोडे व सूर्यभान म्हसे तसेच पाथरे खुर्द येथे गीताराम घारकर, रखमाजी जाधव, नारायण टेकाळे, बाळासाहेब जाधव, शिवाजी टेकाळे, हरिभाऊ जाधव, वामन पवार, नानासाहेब पवार, दीपक जाधव, विजय जाधव उपस्थित होते.