पेरणीसाठी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:28+5:302021-06-17T04:15:28+5:30
शिरसगाव व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका या वाणाची पेरणी केलेली आहे. शिरसगावात कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे ...
शिरसगाव व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका या वाणाची पेरणी केलेली आहे. शिरसगावात कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढणार हे नक्कीच पण पाऊस उघडल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. जर दहा दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल. त्यासाठी कोपरगाव कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे कमीत कमी हातभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये.
....................
सहा ते सात दिवसांपासून पावसाने उघड दिली आहे. पाऊस कधी येईल सांगता येणार नाही. सध्या पेरणी योग्य ओल नाहीये तरी कोणत्याही शेतकऱ्याने पेरणीसाठी घाई करू नये. अन्यथा वेळेवर पाऊस न आल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावेल.
- अशोक आढाव, कोपरगाव कृषी अधिकारी
..........
प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी आतापर्यंत ७० ते ७५ टक्के लोकांनी बियाणे खरेदी केले आहे. यात सोयाबीनची जास्त खरेदी झाली आहे. कपाशीची खरेदी कमी प्रमाणात झाली आहे. शिरसगाव मुख्य मार्केट असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील सर्व शेतकरी शिरसगावात बियाणे खरेदीस येत असतात.
-राहुल गायकवाड, कृषिसेवा केंद्र चालक, शिरसगाव