शेतक-यांना पाणीमिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आशुतोष काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 02:03 PM2018-11-29T14:03:11+5:302018-11-29T14:03:20+5:30

गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळावे यासाठी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर सात नंबर अर्ज भरून दिले आहेत.

Farmers will not be fit without water: Ashutosh Kale | शेतक-यांना पाणीमिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आशुतोष काळे

शेतक-यांना पाणीमिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : आशुतोष काळे

कोपरगाव  : गोदावरी कालव्याचे आवर्तन मिळावे यासाठी शेतक-यांनी पाटबंधारे विभागाकडे रीतसर सात नंबर अर्ज भरून दिले आहेत. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांना समक्ष भेटून अडीच किलोमीटर पर्यंत पाणी देण्याची अट रद्द करावी, अन्यथा आपण राहाता उपविभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असे निवेदन दिले होते. परंतु यासंदर्भात पाटबंधारे विभागाने शेतक-यांच्या बाबतीत कोणताच सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे आपण सांगीतल्याप्रमाणे ठिय्या आंदोलन करीत असून जोपर्यंत सात नंबर अर्ज केलेल्या सर्वच शेतक-यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. तोपर्यंत स्वस्थ बसणार नसणार नाही असा इशारा कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते आशुतोष काळे यांनी दिला.
आशुतोष काळे यांच्या आवाहनाला पाठींबा देत रामपूरवाडीच्या शेतक-यांनी दोन दिवसापासून पाटबंधारे कार्यालयात आमरण उपोषण सुरु केले आहे. काळे ठिय्या आंदोलन करण्यासाठी आंदोलन स्थळी पोहोचण्यापूर्वीच उपविभागीय अभियंता कासम गोटमवार नाशिक येथे वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले. उपविभागीय अभियंता कासम गोटमवार यांना परिस्थितीची जाणीव करून दिली.


तीन दिवसांपूर्वीच एका पाटबंधारे विभाग फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच शेतीसासाठी पाणी देणार असल्याची माहिती शेतक-यांना दिली होती. घेतलेला हा निर्णय लाभक्षेत्रातील शेतक-यांवर अन्याय करणारा आहे. तसेच शेतक-यांच्या दु:खाची जाणीव नसणा-या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना तालुक्यात काय चालू आहे याची पुसटशी कल्पना नसते त्यांनी माझ्या मागणीला टीका समजूनखिल्ली उडविली. गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय दुदैर्वाची गोष्ट असल्याची खंतही यावेळी आशुतोष काळे यांनी व्यक्त केली .

Web Title: Farmers will not be fit without water: Ashutosh Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.