ऊसावर आलेल्या तांबेरी रोगामुळे शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 01:03 PM2020-09-13T13:03:52+5:302020-09-13T13:05:50+5:30

तरवडी : नेवासा परिसरात ऊस पिकावर ज्वारीवर येणारा तांबेरी नावाचा रोग ऊस पिकावर आला आहे. त्यामुळे ऊसाची पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसत आहेत.

Farmers worried over sugarcane blight | ऊसावर आलेल्या तांबेरी रोगामुळे शेतकरी चिंतेत 

ऊसावर आलेल्या तांबेरी रोगामुळे शेतकरी चिंतेत 

तरवडी : नेवासा परिसरात ऊस पिकावर ज्वारीवर येणारा तांबेरी नावाचा रोग ऊस पिकावर आला आहे. त्यामुळे ऊसाची पाने पिवळी पडून करपल्यासारखी दिसत आहेत.

एकतर शेतकरी आपल्या शेतात अनेक अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करत शेतमाल पिकवत आहे. परंतू  'कोविड १९' व  लाॅकडाऊनमुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यात हे अनपेक्षित आलेले तांबेरी रोगामुळे शेतकर्‍यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कारण साखर कारखाने सुरू होण्यास बराच अवधी आहे. तसेच वारंवार पडणार्‍या जोराच्या पावसामुळे ऊस पिके खाली पडून भुईसपाट झाली आहेत. वरील सर्व कारणांमुळे शेतकरी चिंतेत आहे.

Web Title: Farmers worried over sugarcane blight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.