दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार समितीचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:48 PM2017-10-12T15:48:55+5:302017-10-12T15:57:02+5:30
दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा तसेच सर्व दिव्यांगांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले.
शेवगाव : तालुक्यातील दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश करावा तसेच सर्व दिव्यांगांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी शेवगाव तालुका प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गुरुवारपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
संघटनेच्या वतीने १६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दिलेल्या निवेदनानुसार नाशिक विभागीय उपायुक्त (पुरवठा) प्रवीण पुरी यांनी त्यांच्या कार्यालयाकडील २४ आॅगस्ट २०१७ च्या पत्रान्वये जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील दिव्यांग लाभार्र्थींना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेमध्ये समवेश करून दिव्यांगाना आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत, मात्र शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडून याबाबत कार्यवाही नसल्याने संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले. याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही होऊन दिव्यांगांना विभक्त शिधापत्रिका देऊन त्यांचा अंत्योदय योजनेत समावेश झाल्याशिवाय आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेचे तालुकाध्यक्ष शेख चांद कादर व अन्य पदाधिकाºयांनी जाहीर केला.
उपोषणात तालुकाध्यक्ष चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी, राजू विटकर, महिलाध्यक्षा सुवर्णा देशमुख, संदीप चेडे, भागवत दहिफळे, नितीन थोरात, मीरा औटी, संजीवनी आदमने, वंदना तिजोरे, सखुबाई मिसाळ, शाहरुख बागवान, नवनाथ ढाकणे, बाळू जायभाय, प्रतीक्षा मगर, मल्हारी शेवाळे, सुमित्रा दौंड, रुपाली अवसरमल, रामेश्वर केदार, चंद्रकला काळे, भागीरथी बावंदकर, मनीषा मोहिते, प्रदीप मगर, विक्रम परमेश्वर आदीसह दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.