उपोषण करून वीज प्रश्नाकडे शेतकऱ्यांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:02+5:302021-08-29T04:22:02+5:30
उपोषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर माजी सभापती शहाजी हिरवे, राजेंद्र काकडे, रामदास झेंडे, सचिन कदम, नितीन नलगे, ...
उपोषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर माजी सभापती शहाजी हिरवे, राजेंद्र काकडे, रामदास झेंडे, सचिन कदम, नितीन नलगे, अमित लगड, शरद लगड, बाबासाहेब बारगुजे, आंबर खामकर, बापू नलगे, कुलदीप कदम, बापू साके, नितीन मोहारे, मंगेश घोडके, पोपट साके, संतोष मेहत्रे, भरत काकडे, अविनाश नलगे आदींनी सहभाग घेतला.
लोणी येथील मुख्य स्टेशनमधून वीज उपलब्ध होण्यासाठी ५० एमव्हीएचे रोहित्र खरेदी करून तातडीने काम पूर्ण करावे, ३३ केव्हीचे काम ८० टक्के झाले आहे. उर्वरित काम पूर्ण झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे, असेही पुरुषोत्तम लगड म्हणाले. राष्ट्रवादीचे उपप्रदेश अध्यक्ष घनश्याम शेलार यांनी भेट घेतली. राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी फोनवर चर्चा करून उर्वरित काम त्वरित पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले व महापारेषणचे त्रिपाठी यांनी उपोषण सोडले.