पिक नोंद लावण्यासाठी नेवासा तहसील समोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 05:29 PM2018-08-31T17:29:22+5:302018-08-31T17:29:38+5:30
तीस वर्षांपासून राहात असलेल्या आदिवासी बांधवांना गायरान जमिनीचे स्थळ निरीक्षण करून पि क नोंद लावण्यात यावी, या मागणीसाठी आज नेवासा परिसरातील आदिवासी बांधवांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
नेवासा : तीस वर्षांपासून राहात असलेल्या आदिवासी बांधवांना गायरान जमिनीचे स्थळ निरीक्षण करून पि क नोंद लावण्यात यावी, या मागणीसाठी आज नेवासा परिसरातील आदिवासी बांधवांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. या उपोषणामध्ये २१ आदिवासी कुटुंबे सहभागी झाली आहेत. उपोषणाचे नेतृत्व सोमनाथ विश्वनाथ माळी व परसराम विश्वनाथ माळी हे करत आहे.
याबाबत आदिवासी प्रबोधन सेवा संघ व तंट्या ब्रिग्रेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदेशाध्यक्ष प्रकाश पवार व सुनील मोरे यांनी अधिका-यांना निवेदन दिले. आदिवासी हे अंगमेहनतीने कसत असलेली गायरान जमिनीवर गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून राहतात. यासाठी गट नंबर ३५/१ व ३५/२ गायरानचा पंचनामा, जबाब स्थळ निरीक्षण होऊन पीक नोंद लावावी, जेणेकरून आम्हाला पिण्याचे पाणी, पक्की घरे, लाईट या सुविधा मिळू शकतील. सध्याची परिस्थिती हलाखीची असून याबाबत त्वरित निर्णय घेऊन पीक नोंद लावण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर सोमनाथ माळी,प् ारसराम माळी, अलका माळी, बाळू माळी, सीताराम माळी, संजय माळी, सोपान गांगुर्डे, नंदा गांगुर्डे, आण्णा गायकवाड, गयाबाई गोलवड, गीता माळी, अर्चना माळी, गंगाराम माळी, बाळासाहेब बर्डे, सुमन मोरे, रमेश गांगुर्डे, सखाराम पवार, अशोक जाधव, जनाबाई पवार, सुशाबाई बर्डे, सर्जेराव माळी, मंगल माळी, मंदा बर्डे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे.