स्कॉपिर्ओच्या धडकेने दुचाकीवरील पिता-पुत्र ठार, पत्नीे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 13:12 IST2021-02-27T13:10:46+5:302021-02-27T13:12:03+5:30
नवरीसोबत करवली गेलेल्या पत्नीला घरी दुचाकीवर घेऊन येत असताना पिता-पुत्राचा अपघातात जागीच मृत्यू झाला. स्काॅर्पियोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी जखमी झाली आहे.

स्कॉपिर्ओच्या धडकेने दुचाकीवरील पिता-पुत्र ठार, पत्नीे जखमी
बोधेगाव : नवरीसोबत करवली गेलेल्या पत्नीला घरी दुचाकीवर घेऊन येत असताना पिता-पुत्राचा अपघातात जागीच मृत्यू झाला. स्काॅर्पियोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. दुचाकीवर पाठीमागे बसलेली पत्नी जखमी झाली आहे.
सदरील कुटूंब लाडजळगाव येथील असून ही घटना शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास शेवगाव-गेवराई मार्गावरील सोनेसावंगी फाट्यानजीक घडली. किरण पांडुरंग झांबरे (वय २८) व शौर्य (वय अडीच वर्ष) अशी अपघाात मृत्यू पावलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत.
किरण पांडुरंग झांबरे यांच्या नजीक बाभूळगाव (ता.शेवगाव) येथील मावस बहिणीचे बुधवारी लग्न झाले. नवरीसोबत किरण यांची पत्नी शुभांगी ही कलवरी म्हणून गेली होती. शुक्रवारी ती नवरीसोबत माघारी बाभूळगाव येथे आली. तिला घरी घेऊन येण्यासाठी किरण झांबरे हे दुचाकीवरून आपला अडीच वर्षाचा एकुलता एक मुलगा शौर्य याला सोबत घेऊन बाभूळगाव येथे गेले. सायंकाळी पत्नीला घेऊन येत असताना शेवगाव-गेवराई मार्गावरील सोनेसावंगी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला चापडगाव मार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या (एम.एच.-१४, एफ.एस. ९१००) या क्रमांकाच्या स्काॅर्पियोने समोरून धडक दिली. यात दुचाकीवरील किरण झांबरे व त्यांचा अडीच वर्षीय चिमुरडा शौर्य हे दोघे जागीच ठार झाले तर पत्नी शुभांगी रस्त्याच्या कडेला उडून पडल्याने गंभीर जखमी झाली.