Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 08:12 PM2020-04-10T20:12:26+5:302020-04-10T20:15:43+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता कोपरगाव येथील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने समोर आले आहे.

Father! Corona patient now found in the corner | Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर 

Corona virus : बापरे! आता कोपरगावात आढळला कोरोनाचा रूग्ण : जिल्ह्याचा आकडा २७ वर 

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग चांगलाच फैलावत असून आता कोपरगाव येथील ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने समोर आले आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालात या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ती व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आजच एका कोरोनाबाधिताला डिस्चार्ज दिला. त्यानंतर तासाभरानेच पुन्हा एका रूग्णाची भर पडली. त्यामुळे नगरमधील रूग्णांची संख्या आता २७ झाली आहे.

तिस-या कोरोनाबाधित रूग्णाला अखेर डिस्चार्ज 

नगरमध्ये पहिले तीनही कोरोनाबाधित रूग्ण आता बरे झाले आहेत. शुक्रवारी  सायंकाळी तिसºया रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी १२२ पैकी १०३ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. नगरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २७ वर गेली आहे. त्यातील एकजण बीड जिल्ह्यातील आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील असलेल्या एका मतिमंद रूग्णाचे पुण्यातील ससूण रूग्णालयात उपचार घेताना शुक्रवारी निधन झाले. पहिल्या दोन रूग्णांना आधीच डिस्चार्ज दिला गेला आहे. त्यामुळे बूथ हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात सध्या २२ रूग्ण आहेत.  दरम्यान तिस-या कोरोनाबाधित रूग्णाचे १४ व १५व्या दिवशीचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून शुक्रवारी सायंकाळी बूथ हॉस्पिटलमधून या रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्या रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाºयांनी या रूग्णाला टाळ्या वाजवून निरोप दिला. 

Web Title: Father! Corona patient now found in the corner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.