मुलाने पित्याचा खून करून मृतदेह लपविला टपरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 02:06 PM2017-11-04T14:06:35+5:302017-11-04T14:14:41+5:30
निर्मलनगर येथील घटना: आरोपी पोलीसांच्या ताब्यात
अहमदनगर : शहरातील निर्मलनगर येथील गाडेकर चौक परिसरात राहणाºया तरूणाने अपंग वडिलांचा खून करून मृतदेह घरासमोरील टपरीत लपवून ठेवला़ शनिवारी सकाळी साडेआकरा वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकिस आली़
खून करणाºया मुलाला पोलीसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले़ दत्तात्रय फकिरा गिते (वय ५०) असे मयताचे नाव असून, अशोक दत्तात्रय गिते (वय २२) असे सदर मुलाचे नाव आहे़ गाडेकर चौक परिसरात चैतन्य अपार्टमेंटसमोर राहणारे दत्तात्रय गिते यांचा घराचा दरवाजा सकाळचे आकरा वाजले तरी घडला नसल्याने शेजारी राहणाºया एका महिलेने दरवाजा लोटून पाहिला तेंव्हा आतून कडी लावलेली होती़ आवाज दिल्यानंतरही काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांनी तोफखाना पोलीसांना माहिती दिली़ घटनास्थळी कॉस्टेबल मनोज ससे व पथक दाखल झाले़ पोलीस आले तेव्हाही घराचा दरवाजा बंद होता़ पोलीसांनी दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला़ तेव्हढ्यात घरातून अशोक गिते हा तरूण बाहेर आला़ त्याच्या स्वेटरवर सुकलेले रक्ताचे डाग होते़ पोलीसांना सयंश अल्याने घराची तपासणी केली़ तसेच मुलाला त्याच्या वडिलांबद्दल विचारले़ त्याने मात्र अपेक्षित उत्तर न दिल्याने पोलीसांनी घर व पाठीमागील बाजूला पाहणी केली़ घरात मात्र कोणीच सापडले नाही़
घराच्या ओट्यालाच खेटून असलेल्या छोट्याश्या टपरीचे पोलीसांनी झाकन उघडून पाहिले तेव्हा दत्तात्रय गिते यांचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथे निदर्शनास आला़ पोलीसांनी तत्काळ अशोक याला ताब्यात घेतले़ पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला़ दत्तात्रय यांच्या डोक्यात व चेहºयावर टनक वस्तुने मारहाण करून त्यांचा खुन केल्याचे प्रदमदर्शनी दिसत होते़ मयत दत्तात्रय हे सायकल रिपेरिंगची टपरी चालवून उपजिविका भागवित होते़ त्यांचा मुलगा अशोक हा त्यांना अनेक दिवसांपासून त्रास देत अल्याचे त्यांचे नातेवाईक व शेजारी राहणाºयांनी सांगितले़