राष्ट्रपिता महात्मा गांधींची संगमनेर भेट प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:19 AM2021-05-22T04:19:10+5:302021-05-22T04:19:10+5:30
शहरातील बाजारपेठ (गांधी चौक) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या भेटीला शुक्रवारी (२१ मे) शंभर वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त ...
शहरातील बाजारपेठ (गांधी चौक) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या भेटीला शुक्रवारी (२१ मे) शंभर वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त गांधी चौकातील महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले, यावेळी डॉ. तांबे बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, संगमनेर इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर, नगरसेवक नितीन अभंग, गजेंद्र अभंग, किशोर पवार, बाळासाहेब पवार, राणीप्रसाद मुंदडा, प्रा. बाबा खरात, सुरेश झावरे, दिलीप जोशी, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, निखिल पापडेजा, ऋतिक राऊत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आदी उपस्थित होते.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, २१ मे १९२१ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संगमनेर शहरात भेट देत मुक्काम केला होता. संगमनेर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या राष्ट्रपुरुषांनी शहरास भेट दिली आहे. या सर्व भेटी या शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा समृद्धी व संपन्न करणाऱ्या आहेत. यातून सदैव प्रेरणा मिळत असल्याचेही डॉ. तांबे म्हणाले. प्रास्ताविक डॉ. खेडलेकर यांनी केले. प्रा. बाबा खरात यांनी ‘वैष्णव जन’ हे गीत गायले. ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत अशोक भुतडा यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
----------
डॉ. संतोष खेडलेकर यांचे ऑनलाइन व्याख्यान
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संगमनेर भेटीला शंभर वर्षं पूर्ण झाल्याने संगमनेर इतिहास संशोधक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांचे शनिवारी ( दि. २२) सायंकाळी ६. ३० वाजता ऑनलाइन पद्धतीने फेसबुकवर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.