अवैध दारु विक्रीमुळे ‘पांगरमल’ होण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2017 02:59 PM2017-04-07T14:59:47+5:302017-04-07T14:59:47+5:30
ढाब्यांवर अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु झाल्याने भविष्यात ‘पांगरमल’ सारख्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स गमनेर: न्यायालयाच्या आदेशाने हमरस्त्याच्या कडेला होणारी दारु विक्री दुकाने-परमिटरुम बार बंद झाल्याने रस्त्याच्या कडेला नेहमीच झिंगाट होऊन पडलेले तळीराम दिसेनासे झाले आहेत. ही सकारात्मक बाब दिसू लागली आहे. मात्र ढाब्यांवर अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु झाल्याने भविष्यात ‘पांगरमल’ सारख्या घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील वडगाव पान परिसरातील पाच परमिटरुम बारसह देशी दारूचे दुकान बंद झाले आहे. एरवी दररोज या हमरस्त्याच्या कडेला हॉटेल व्यवसायामुळे नेहमी वर्दळ असायची. ही गर्दी रोडावली आहे. रात्री उशिरा रस्त्यांवर शुकशुकाट पसरलेला असतो. हॉटेलमधे रोजंदारीवर काम करणाºया कामगार युवकांना इतरत्र रोजगार शोधाशोध करावी लागत आहे. दरम्यान अकोले येथील देशी विदेशी दारु विक्रते व परमिटरुम बार मालक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन बुधवारी सायंकाळी भूमिका मांडली. भविष्यात अवैध दारु विक्री वाढेल, तसेच अपघातांची संख्या कमी होणार नाही, असा दावा बार मालक संघटनेचे संजय देशमुख,रमाकांत आभाळे,शिवाजी देशमुख यांनी केला आहे.(तालुका प्रतिनिधी)