महिला ग्रामसेवकाला पंधरा हजारांचा दंड, राज्य माहिती आयुक्तांचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:51 PM2021-02-20T17:51:11+5:302021-02-20T17:54:28+5:30
पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के.एल.बिश्नोई यांनी पंधरा हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे.
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील डिकसळ येथील महिला ग्रामसेविका तथा जन माहिती अधिकारी वैशाली दत्तु औटी यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी पंधरा हजार रुपंयाचा दंड ठोठावला आहे.
डिकसळ येथील लोकजागृती सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते अरुण भागा काकडे यांनी येथील ग्रामसेवक यांच्याकडे माहिती मिळण्यासाठी जानेवारी २०१७ मधे अर्ज दाखल केला होता.
माहितीसाठी लागणारे शुल्क भरूनही माहिती न मिळाल्याने त्यांनी गटविकास अधिकारी पारनेर यांच्याकडे प्रथम अपिल दाखल केले होते. प्रथम अपिलात माहिती देण्याचे आदेश होवूनही माहिती न दिल्यामुळे अरुण काकडे यांनी राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिल दाखल केले होते.
राज्य माहिती आयोगाकडे युक्तीवाद करताना आपण डाकद्वारे अर्जराला माहिती पाठवली होती. परंतु अर्जदार पाठवलेली माहिती स्वीकारत नाहीत व व्यक्तीशः येवुनही माहिती घेत नाहीत, असा ग्रामसेविकेने केलेला दावा पुराव्यांअभावी माहिती आयुक्तांनी फेटाळून लावला.