कौठा शिवारात आढळले स्त्री जातीचे अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:40+5:302021-05-24T04:20:40+5:30

नेवासा : तालुक्यातील कौठा शिवारातील एका विहिरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळले. आरोग्य ...

Female infants found in Kautha Shivara | कौठा शिवारात आढळले स्त्री जातीचे अर्भक

कौठा शिवारात आढळले स्त्री जातीचे अर्भक

नेवासा : तालुक्यातील कौठा शिवारातील एका विहिरीजवळ असलेल्या उसाच्या शेतात नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीचे अर्भक बेवारस स्थितीत आढळले.

आरोग्य विभागाच्या पथकाने त्यास मृत घोषित केले. या घटनेने कौठा, चांदा परिसरात मोठी खळबळ उडाली. या अमानुष घटनेचा पोलिसांनी तपास लावावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

कौठा-महालक्ष्मी हिवरा रस्त्यावरील गट नंबर १५८ मध्ये जमीन असलेले गणेश संभाजी बोरकर हे उसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी सकाळी गेले होते. त्यानंतर तेथे अर्भक बेवारस अवस्थेत दिसले. त्यांनी ही माहिती त्यांचे मित्र अनिल जावळे व सरपंच मच्छिंद्र डाके यांना सांगितली. त्यानंतर ही माहिती त्वरित सोनई पोलीस ठाण्यात कळविली. नुकतेच जन्मलेले हे स्त्री जातीचे अर्भक काही काळ जिवंत होते. मात्र, त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. बाळाच्या डोक्याला मार लागल्यासारख्या काही खुणा दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी पाठविले. आरोग्य विभागाचे पथकही हजर झाले होते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाळाची पाहणी केली असता हे अर्भक मृत घोषित करण्यात आले. अर्भक उत्तरीय तपासणीसाठी नेवासा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नानासाहेब तुपे, हेडकॉन्स्टेबल ए. एम. दहिफळे तपास करीत आहेत.

Web Title: Female infants found in Kautha Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.