भविष्यात आरोग्यपत्रिका असल्याशिवाय खते मिळणार नाहीत : भाऊसाहेब ब-हाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:34 PM2018-06-05T18:34:16+5:302018-06-05T18:34:27+5:30

माती वाचली, तर देश वाचेल. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून प्रयत्न करतो. सध्याच्या काळात माणसाचे जीवनमान कमी होत चालले आहे.

Fertilizers will not be available without future health-plan: Bhausaheb B-Hatta | भविष्यात आरोग्यपत्रिका असल्याशिवाय खते मिळणार नाहीत : भाऊसाहेब ब-हाटे

भविष्यात आरोग्यपत्रिका असल्याशिवाय खते मिळणार नाहीत : भाऊसाहेब ब-हाटे

अहमदनगर : माती वाचली, तर देश वाचेल. आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतो, निरोगी आयुष्य जगता यावे म्हणून प्रयत्न करतो. सध्याच्या काळात माणसाचे जीवनमान कमी होत चालले आहे. परंतु मातीला अनंत पिढ्या जगावयच्या आहेत. त्यामुळे तिचे आरोग्य पाहिले पाहिजे. असमतोल खताचा वापर, पाण्याचा योग्य वापर यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. भविष्यात जमीन आरोग्य पत्रिका असल्याशिावय खते दिली जाणार नाहीत, असे मत आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब ब-हाटे यांनी केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा अंतर्गत किसान क्रांती सेंद्रिय शेतीगट, माळवडगाव येथे आयोजित जमीन सुपिकता व खत व्यवस्थापन कार्यक्रमप्रसंगी ब-हाटे बोलत होते.
ब-हाटे म्हणाले, खतावर शासन लाखो रुपये देत आहे. ते जपून वापरले पाहिजे. जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा. पाण्याची पातळी घटत चालली आहे. देशात पहिले राज्य आहे की भुजल अधिनियम कादा लागू केला आहे. हा निर्णय शासनाने घेतला आहे. तो गावक-यांच्या भल्यासाठीचा आहे. गाव बळकट व्हायला हवे. उकिरडा मुक्त गावची संकल्पना राबवली पाहिजे. बायोडायनेमिक खतांचा वापर वाढवला पाहिजे, असे सांगितले. यावेळी मृद शास्त्रज्ञ अनिल दुरगुडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, सतीश शिरसाठ, सरपंच बाबासाहेब चिडे, उपसरपंच गिरीधर आसने, कृषी सहाय्यक ए. यू. काळे, बीटीएम मीनाक्षी बडे, एटीएम मानकर, सुनील आसने, प्रमोद आसने आदींसह शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक बीटीएम मीनाक्षी बडे यांनी केले. आभार प्रमोद आसने यांनी मानले.

 

Web Title: Fertilizers will not be available without future health-plan: Bhausaheb B-Hatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.