टाकळी ढोकेश्वरमध्ये अडकलेले पंधरा विद्यार्थी उन्नावकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:54 PM2020-05-03T16:54:46+5:302020-05-03T16:55:25+5:30
टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे.
टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थी रविवारी सकाळी उत्तर प्रदेशातील उन्नावकडे रवाना झाले. त्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने एक एसटी बस उपलब्ध करून दिली आहे.
टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयात उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील १५ विद्यार्थी इयत्ता नववीतील शिक्षणासाठी आले आहेत. वर्षाच्या अंतर्गत आदान प्रदान अभ्यासक्रमासाठी ते आले होते. तर टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील १५ विद्यार्थीही उन्नाव येथील नवोदय विद्यालयात इयत्ता नववीतील वर्षाच्या अंतर्गत आदानप्रदान अभ्यासक्रमासाठी गेले होते. एप्रिल अखेर दोन्हीकडचेही विद्यार्थी पुन्हा त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी परतणार होते. मात्र मार्च अखेरीस देशभर लॉकडाऊन सुरू झाले. त्यानंतर टाकळीचे विद्यार्थी उन्नावला तर उन्नावचे विद्यार्थी टाकळीत अडकले. याबाबतची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार निलेश लंके यांना दिली. त्यांनी तातडीने टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयास भेट दिली. विद्यालयाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील जिल्हा प्रशासनाशी संपर्क करून या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशातील उन्नावला जाण्याची परवानगी दिली.
टाकळी येथील उन्नावला असणारे विद्यार्थी परत टाकळली सोडण्यासाठी परवानगी घेतली. टाकळी ढोकेश्वर येथील नवोदय विद्यालयातील १५ विदयार्थ्यांना रविवार सकाळी ८:३० वाजता एसटी बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून उन्नावकडे रवाना करण्यात आले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्व विद्यार्थ्यांनाना कोरोना संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्राचार्य एस. बी. बोरसे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.