कोतूळात पंधरा वर्षाच्या सत्तेला सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:18 AM2021-01-22T04:18:54+5:302021-01-22T04:18:54+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या कोतूळ ग्रामपंचायतीत पंधरा वर्षांच्या जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख ...
कोतूळ : अकोले तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या कोतूळ ग्रामपंचायतीत पंधरा वर्षांच्या जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख व बी. जे. देशमुख समर्थकांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख व भाजपचे राजेंद्र देशमुख यांनी तेरा विरूध्द चार असा विजय संपादन केला आहे.
साडेसहा हजारांवर मतदार दरवर्षी कोटीची उलाढाल असलेल्या कोतूळ ग्रामपंचायत २००५ ला बिनविरोध झाली. यावेळी मिराबाई देशमुख, शकुंतला आरोटे यांनी सरपंच पदाचा कारभार पाहीला. २०१० च्या पंचवार्षिक निवडणूकीत बी. जे. देशमुख व जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख गटाने एकहाती सत्ता मिळवली. यावेळी इंदिरा गोडे सरपंच होत्या. २०१५ च्या निवडणुकीतही जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख गटाला एकहाती सत्ता मिळाली. या गटाच्या सरपंच म्हणून अनुसया धराडे यांनी कारभार पाहीला.
यंदा रमेश देशमुख व बी. जे. देशमुखांनी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवत पॅनल न देण्याचे जाहीरही केले. मात्र ऐनवेळेस समर्थकांनी विविध प्रभागात उमेदवारी भरून पॅनाल उभे केल्याने व घरच्या भाविकीतील अरविंद देशमुख, समर्थक रविंद्र आरोटे, अनिल देशमुख यांनी अर्ज दाखल केल्याने माघारीनंतर बी. जे. देशमुख यांना सहभाग नोंदवावाच लागला. मात्र अटीतटीच्या लढाईत तेरा विरूध्द चारच्या फरकाने राष्ट्रवादीचे हेमंत देशमुख व भाजपचे राजेंद्र देशमुख यांनी पंधरा वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला.
............
राष्ट्रवादी व भाजपचे नेते
हेमंत देशमुख, संजय देशमुख, शंकर घोलप, राजेंद्र नानासाहेब देशमुख, स्वाती नितीन पवार
....
विजयी उमेदवार
दोन्ही गटाचे स्वाती प्रविण पोखरकर, कविता रोहिदास जाधव, माधुरी संदिप भुजबळ, सुनिता गौरव शेळके, मेघा विनय आरोटे, अलका मनोहर तारू, सुनील गोते, भास्कर लोहकरे हे विजयी झाले.
............
रमेश देशमुख गटाचे
अमोल विठ्ठल भांगरे, नंदीनी संतोष चोथवे, मारुती किसन गोडे, रेश्मा हरेश धराडे हे विजयी झाले.
........................
निवडणुकांतील हालचाली
भाजपचे राजेंद्र देशमुख यांनी सर्वाधिक १५० पेक्षा जास्त मतांनी विजय संपादन केला.
राष्ट्रवादीचे संजय देशमुख नऊ मतांनी विजयी
भाजपचे तालुका उपाध्यक्ष गणेश पोखरकर यांच्या पत्नी सविता पोखरकर यांचा निसटता पराभव