तिसगाव कोविड सेंटरसाठी पन्नास बेड देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:19 AM2021-04-16T04:19:32+5:302021-04-16T04:19:32+5:30
आठरे म्हणाल्या, तिसगावसह परिसरातील तीस-पस्तीस गावाोमध्ये गेल्या काही दिवसाोपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे व शहरी भागाबरोबरच ग्रामीण ...
आठरे म्हणाल्या, तिसगावसह परिसरातील तीस-पस्तीस गावाोमध्ये गेल्या काही दिवसाोपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे व शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील कोरोना रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या २५ बेडची व्यवस्था करण्यात आली असली तरी ती व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आणखी ५० बेड याठिकाणी देण्याचे नियोजन मी केले आहे. जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या कोरोना रुग्णांची गैरसोय दूर व्हावी हा यामागचा हेतू आहे. तिसगाव कोविड सेंटरमध्ये दररोज किमान ३० ते ४० नवीन रुग्ण रोज सेंटरमध्ये दाखल होण्यासाठी येत असून जागेअभावी त्यांना मोहटादेवी किंवा नगरला हलविण्यात येत आहे, असे आठरे यांनी सांगितले.