लॉकडाऊनमध्ये पंचावन्न लाख भाविकांचे घरबसल्या साईदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:55 PM2020-04-27T17:55:09+5:302020-04-27T17:55:57+5:30

कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले आहे.

Fifty-five lakh devotees sit at home in lockdown | लॉकडाऊनमध्ये पंचावन्न लाख भाविकांचे घरबसल्या साईदर्शन

लॉकडाऊनमध्ये पंचावन्न लाख भाविकांचे घरबसल्या साईदर्शन

     प्रमोद आहेर/
      शिर्डी : कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी मंदिराची दारे बंद करण्यात आली. असे असले तरी भाविकांच्या श्रद्धेची दारे बंद होऊ शकले नाहीत. साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असूनही रोज सरासरी एक लाख अडतीस हजार भाविक घरबसल्या साईदर्शनाचा आनंद घेत असल्याचे समोर आले आहे.
मंदिर बंदच्या काळात जवळपास ५५ लाख भाविकांनी वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप व टाटा स्कायच्या माध्यमातून घरबसल्या साईदर्शन घेतल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी १७ मार्च रोजी साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर १८ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान साडेतीन लाख लोकांनी साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवरून बाबांचे दर्शन घेतले आहे. या माध्यमातून रोज सरासरी ८७६४ भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत. याशिवाय साईबाबा संस्थानने टाटा स्कायला लाईव्ह दर्शनाचे हक्क दिले आहेत. टाटा स्कायवरून रोज एक लाखाहुन अधिक भाविक साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतात. मार्चमध्ये तब्बल साडेचार लाख नवीन दर्शकांची वाढ झाली आहे. अद्याप एप्रिलची माहिती टाटा स्कायकडे उपलब्ध नसल्याचे संस्थानचे आयटी विभागाचे प्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले.
एक भाविक रोज सरासरी वीस मिनीटे लाईव्ह दर्शन घेत असतो असेही शिंदे यांनी सांगितले. टाटा स्कायवरूनही बंदच्या काळात चाळीस लाख भाविकांनी घरबसल्या साईदर्शन घेतले आहे. याखेरीज सुदर्शनसारखे राष्ट्रीय चॅनल व अनेक लोकल चॅनल रेकॉर्ड केलेल्या चारही आरत्या दाखवत असतात. त्या माध्यमातुनही अगणित भाविक साईबाबांशी जोडलेले आहेत, असेही डोंगरे यांनी सांगितले.
एक लाख भाविकांकडे संस्थानचा अ‍ॅप
साईबाबा संस्थानने मोबाईल अ‍ॅप बनवलेला आहे. जगभरातील जवळपास एक लाखाहून अधिक भाविकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केलेला आहे़ रोज कमीतकमी पंचवीस हजार भाविक या अ‍ॅपच्या माध्यमातून साईबाबांशी जोडलेले असतात. या अ‍ॅपच्या मदतीने बंदच्या काळात आजवर दहा लाख भाविकांनी साई दर्शनाचा आनंद घेतलेला असावा, असे डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: Fifty-five lakh devotees sit at home in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.