पन्नास टक्के रुग्णांचा व्हेंटिलेटरवरच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:11+5:302021-06-01T04:16:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यू हे व्हेंटिलेटरवरच झालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजार ...
अहमदनगर : जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ५० टक्के मृत्यू हे व्हेंटिलेटरवरच झालेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजार जणांचा मृत्यू व्हेंटिलेटर लावल्यानंतरच झालेला आहे. ऑक्सिजन पातळी खालावणे आणि उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अशा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत ७५ हजार नागरिक कोरोनाबाधित झाले. तर दुसऱ्या लाटेत दीड लाखांच्यावर बाधित झाले. पहिल्या लाटेमध्ये ११४३ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत १४२० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांपैकी हे प्रमाण एक टक्क्यांच्या खाली होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण १.१४ टक्के इतके झाले. बाधितांची संख्या जशी वाढली तशी गंभीर रुग्णांची संख्याही वाढली. त्यामुळे व्हेंटिलेटरची रुग्णांना जास्त गरज भासली. व्हेंटिलेटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी केवळ ५ ते १० टक्केच रुग्णांचा जीव वाचलेला आहे. अन्य रुग्णांनी उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
अतीगंभीर रुग्णांनाच व्हेंटिलेटर लावण्यात येते. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांमध्येही व्हेंटिलेटर आहेत. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास आहे. व्हेंटिलेटरमधील ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरच्या स्वच्छतेबाबत ओरड झाली होती. मात्र, हे दोन्हीही बदलण्यात येतात. तसेच व्हेंटिलेटरची स्वच्छता नियमित केली जाते.
--------------
व्हेंटिलेटरचा मास्क दररोज बदलला जातो. नवीन मास्क दिला जातो. एकच रुग्ण व्हेंटिलेटरवर कायम असेल तर त्यावेळीही २४ तासाने मास्क बदलला जातो. तसेच नवीन रुग्ण आल्यानंतर मास्क नवा वापरण्यात येतो.
-डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
-------------
एकूण रुग्ण
बरे झालेले रुग्ण
व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण-१५००
व्हेंटिलेटर लावल्यानंतर मृत्यू झालेले -१४००
---------
रुग्णांचे नातेवाईक काय सांगतात...
खासगी रुग्णालय, नगर
सुरवातीच्या काळात व्हेंटिलेटर लावण्यासाठी डॉक्टर येतच नव्हते. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या स्वच्छतेचा प्रश्न होता. कधीतरी कोणीतरी त्याकडे लक्ष द्यायचे.
----
ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंदा
रुग्णालयात व्हेंटिलेटर होते. मात्र ते कसे लावायचे, कसे स्वच्छ करायचे, याची माहिती कोणालाही नव्हती. रुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्याचा फायदा होईल की नाही, याचीच शंका होती.
--------------
शेवगाव रुग्णालय
डॉक्टर कधी येतात, कधी जातात, त्यावरच आमचे लक्ष असते. व्हेंटिलेटरचे ज्ञान नसल्याने ते स्वच्छ केले जाते की नाही, त्याला मास्क असतो, तो बदलला जातो, याबाबत माहितीच नाही. तरीही डॉक्टर मंडळी तळमळीने उपचार करीत होते.
----------
...तर धोका वाढतो
१) व्हेंटिलेटर्सच्या ईटी ट्यूब व ड्युमिडिफायरची स्वच्छता दर सहा तासांनी होणे गरजेचे आहे. यासाठी स्टराईल वॉटरचा वापर करावा लागतो.
२) जर अशा पद्धतीने स्टराईल वॉटर वापरून स्वच्छता झाली नाही तर इन्फेक्शन वाढण्याचा अथवा भविष्यात म्युकमायकोसिससारख्या आजाराचा धोका संभवतो.
-------
डमी आहे.