निऱ्हाळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पन्नास हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:42+5:302021-05-25T04:23:42+5:30
पाथर्डी : येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील कोविड केअर केंद्रांना आवश्यक अन्न तसेच आरोग्य साधनांच्या ...
पाथर्डी : येथील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील कोविड केअर केंद्रांना आवश्यक अन्न तसेच आरोग्य साधनांच्या स्वरूपात पन्नास हजारांची मदत करण्यात आली आहे. २००७ साली एम. एम. निऱ्हाळी विद्यालयातून १२ वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पन्नास हजार रुपयांचा कोविड सहायता निधी उभारण्यात आला. या निधीतून शाहीद बागवान, महेश दौंड, गणेश वाखुरे, निलेश चव्हाण तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेल्या मित्र परिवाराकडून शहरातील सुमन कोविड केअर केंद्र, लोकनेते गोपीनाथ मुंढे कोविड केअर केंद्र, तिलोक जैन कोविड केअर केंद्र माणिकदौंडी, आगसखांड येथील गोपीनाथ मुंडे कोविड केंद्र येेथे सॅनिटायझर, मास्क, आवश्यक औषधे, शुद्ध पाणी, खजूर, अंडी, सकस आहार आदींसह पन्नास गरीब कुटुंबांना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.
----
२४ पाथर्डी मदत
240521\img-20210523-wa0070.jpg
पाथर्डी येथील एम.एम.निह्राळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने तालुक्यातील ४ कोविड केअर केंद्रांना ५० हजारांचे सकस आहार तसेच आरोग्य साधनांचे वितरण करताना शाहिद बागवान,महेश दौंड,गणेश वाखुरे,निलेश चव्हाण आदी.