पन्नास वर्षांचे तिसगाव बसस्थानक भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:39+5:302021-09-16T04:27:39+5:30
तिसगाव शहरातून पैठण, औरंगाबाद, पाथर्डी, मोहटादेवीमार्गे बीड, नांदेडकडे जाता येते. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनच तिसगावकडे पाहिले जाते. चांदबीबीचा सरदार महाराजा ...
तिसगाव शहरातून पैठण, औरंगाबाद, पाथर्डी, मोहटादेवीमार्गे बीड, नांदेडकडे जाता येते. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणूनच तिसगावकडे पाहिले जाते. चांदबीबीचा सरदार महाराजा सलाबतखान यांनी हे शहर वसविले. गावाच्या सर्वांगीण शोभेसाठी तीस वेशी बांधल्या, असे सांगितले जाते.
शरद शेंदूरकर म्हणाले, तिसगाव शहरातून जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने इतर जिल्ह्यातून वर्दळ वाढली आहे. जवळपास ऊन, वारा पाऊस यांच्यापासून प्रवाशांना दिलासा मिळण्यासाठी निवारा म्हणून हे बसस्थानकच एकमेव आधार होते.
अरीफ तांबोळी म्हणाले, पाऊस आला की, प्रवासी आजूबाजूच्या टपऱ्या व व्यापारी पेठेतील दुकानांचा आसरा घेतात. त्यातही गिऱ्हाईक जास्तीचे असेल तर दुकानदार नाके मुरडतात. मग महिला प्रवाशांची अडचण होते. महामार्ग रूंदीकरण आवश्यकच आहे. प्रवासी निवारा अगोदर करून जुने बसस्थानक पाडायला हवे होते. श्री क्षेत्र मढी, मायंबा, वृद्धेश्वर, हनुमान टाकळी या देवस्थळी जाण्यासाठी तिसगाव शहरातून जावे लागते. त्यामुळे भाविकांच्या निवाऱ्यासाठी महामार्ग विभागाने सोय करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून केली जाणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लवांडे यांनी सांगितले.
---
१५ तिसगाव अतिक्रमण
तिसगाव येथे रस्ता रूंदीकरणासाठी पाडण्यात आलेले बसस्थानक.