ऑक्सिजनसाठी मारामार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:46+5:302021-04-25T04:20:46+5:30
----------------- ऑक्सिजनअभावी तीन जणांचा मृत्यू गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतही ऑक्सिजन बेडची कमतरता होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजन बेडअभावी ...
-----------------
ऑक्सिजनअभावी तीन जणांचा मृत्यू
गतवर्षीच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेतही ऑक्सिजन बेडची कमतरता होती. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात कुठेही ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. जिल्हा रुग्णालयात एका बाहेर गावावरून आलेल्या रुग्णाला वेळेत ऑक्सिजन बेड मिळाला नाही, त्यामुळे एकाचा मृत्यू झाला. मात्र, हा दावा जिल्हा रुग्णालयाने फेटाळला आहे, तसेच श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयामध्ये दोन जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग करावी लागत असल्याचे यातून दिसते.
---------------
नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही तर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन केले पाहिजे. रेमडेसिविरचा पुरवठा अत्यंत कमी आहे. मात्र, सदरचे इंजेक्शन हे संजीवनी नाही. त्यामुळे एकमेव इंजेक्शनचा आग्रह करू नये. जे गंभीर आहेत, अशांनाच रेमडेसिवीर द्या. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर काम सुरू आहे. रुग्णांच्या संख्येनुसार समप्रमाणात ऑक्सिजन वाटप सुरू आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी