चिंचवड शाखेतील घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:38+5:302021-01-22T04:19:38+5:30
बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनातच कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात माजी संचालक राजेंद्र गांधी, सदा ...
बॅंकेचे प्रशासक सुभाषचंद्र मिश्रा यांच्या दालनातच कृती समितीच्या सदस्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात माजी संचालक राजेंद्र गांधी, सदा देवगावकर, अतुल भंडारी, अनिल गट्टाणी, ऋषिकेश आगरकर, रुपेश दुगड, राहुल लोढा, मनोज गुंदेचा, भैरवनाथ वाकळे यांनी सहभाग घेतला. नगर अर्बन को-ऑप बँकेच्या चिंचवड येथील शाखेमध्ये २२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रक्रियेत दोन कंपन्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाले आहे. त्याला तत्कालीन संचालक मंडळाची साथ होती. एका रात्रीत हे कर्ज मंजूर करून यातील अकरा कोटी रुपये संबंधित पदाधिकाऱ्यांनी घेतले.
संगनमत करून हा घोटाळा केल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बँकेचे प्रशासक मिश्रा यांनी या प्रकरणासंदर्भात तत्काळ गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले.
---
फोटो- २१ अर्बन बॉंक
नगर अर्बन बॅंकेतील चिंचवड शाखेमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करताना अर्बन बॅंक कृती समितीचे सदस्य