अनिल राठोड यांच्यावर गुन्हा दाखल, वृद्धेश्वरला जमावबंदी आदशाचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 07:43 PM2020-06-22T19:43:10+5:302020-06-22T19:43:18+5:30
तिसगाव : घाटशिरस (ता. पाथर्डी ) येथील वृद्धेश्वर देवस्थान परिसरात देवस्थानचे पुजारी व कर्मचाºयांना किराणा तर माकड व इतर मुक्या जनावरांना बिस्कीट, केळी, फरसाण यांचे वाटप केले. यावेळी तोंडाला मास्क न लावणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह सात जणांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस कर्मचारी भगवान सानप यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि. २२) सकाळी अकरा वाजता माजी आमदार अनिल राठोड, दिलीप सातपुते, गिरीश जाधव, मदन आढाव, मनीष गुगळे, सतीष चोपडा, विशाल वायकर व मंदार मुळे (रा. अहमदनगर) यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. जमावबंदी आदेश असतानाही ते एकत्र आले. देवस्थानचे पुजारी, सफाई कर्मचारी यांना किराणा वाटप केले. तसेच वानर, माकड, कुत्री, मुकी जनावरे आदींना बिस्कीट, केळी, फरसाणचे वाटप केले. याचे फोटो सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारीत केले. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी देखील जमावबंदी आदेश उल्लंघन केले. राठोड यांच्यावर आतापर्यंत कोरोना लॉकडाऊनचे नियम तोडल्याप्रकरणी दुसºयांदा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी चिनीचा निषेध करण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचा भंग झाला होता.