पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:20 AM2020-12-31T04:20:59+5:302020-12-31T04:20:59+5:30
जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, सचिन खेमनर, नगरसेवक ...
जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, सचिन खेमनर, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, आनंद वर्पे, हैदर अली सय्यद, शेखर सोसे, हर्षल रहाणे, सिध्देश घाडगे, सागर कानकाटे, रोहित वाळके, शहेबाज शेख आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हे घाट ते बोटा खिंड परिसरात पावसामुळे अनेक खड्डे पडले आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनावश्यक बाभळी काढणे. बोटा, अकोले नाका, साकूर फाटा, माझे घर हौसिंग सोसायटी (घुलेवाडी) या ठिकाणी सर्व्हिस रोड तयार करावे. स्ट्रीट लाईट दुरुस्त कराव्यात. टोलवर स्थानिकांना रोजगार मिळावा. कर्मचाऱ्यांची पगार वाढ करावी. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
__
फोटो नेम : ३०काँग्रेस निवेदन
...
ओळ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत. यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
--------