पुणे- नाशिक महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:13+5:302020-12-30T04:28:13+5:30
खड्डे पडले आहेत. याचा प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे १० दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ...
खड्डे पडले आहेत. याचा प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे १० दिवसांच्या आत बुजविण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस व एनएसयूआय यांच्या वतीने मंगळवारी (२९ डिसेंबर) तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोल कंपनी आयएलएफएसला निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, सचिन खेमनर, नगरसेवक नितीन अभंग, शैलेश कलंत्री, आनंद वर्पे, हैदर अली सय्यद, शेखर सोसे, हर्षल रहाणे, सिद्धेश घाडगे, सागर कानकाटे, रोहित वाळके, शहेबाज शेख आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हे घाट ते बोटा खिंड यादरम्यान पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकांना महामार्गावरील खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या अनावश्यक बाभळी काढणे. बोटा, अकोले नाका, साकूर फाटा, माझे घर हौसिंग सोसायटी (घुलेवाडी) या ठिकाणी सर्व्हिस रोड तयार करावेत. स्ट्रीट लाईट दुरुस्त कराव्यात. तसेच टोलवर स्थानिकांना रोजगार मिळावा. कर्मचाऱ्यांची पगारवाढ करावी. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
_
.......
फोटो नेम : २९काँग्रेस निवेदन, संगमनेर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावेत. यासह अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.