श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर तलावाच्या भरावाला भेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:18 PM2017-12-26T12:18:31+5:302017-12-26T12:19:36+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील हंगा नदीवरील विसापूर तलावाच्या मातीच्या भरावाला भेग पडली आहे. जवळपास १०० फुट उभी लांबीची भेग पडली असून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काल पाहणी केली.
ब्रिटिशांनी १८९६ साली विसापूर तलावाचे बांधकाम सुरु केले. सन १९२७ साली तलावाचे काम पूर्ण झाले. या कामासाठी त्याकाळी ४० लाख ४ हजार ३३२ रुपये खर्च झाला. सर्वप्रथम १९२८ साली पाण्याने भरला. तलावाची उंची ८४ फुट असून त्याची क्षमता ९२२ एम.सी.एफ.टी. इतकी आहे. या तलावावरील कालव्याची लांबी २५ किलोमीटर आहे. विसापूर तलावाखाली पिंपळगाव पिसा, बेलवंडी, घारगाव, खरात वाडी, पिसोरे, चिंभळ, शिरसगाव बोडखा या गावातील सुमारे १३ हजार १४३ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. तलाव गेल्या पाच ते सहा वर्षानंतर यंदा प्रथमच १०० टक्के भरला आहे.