अखेर नेहरू पुतळ्यासमोरील फलक हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:25+5:302021-01-13T04:53:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोरील फलक अखेर सोमवारी हटविण्यात आले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोरील फलक अखेर सोमवारी हटविण्यात आले आहे. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कारवाईचे काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका अधिकारी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, संतोष लांडगे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचे डॉ. सईद काझी, युनूसभाई तांबटकर उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बैठकीत भोसले यांनी वरील आदेश दिले. जिल्हाधिकारी भोसले यांच्या आदेशानंतर नेहरू पुतळा येथील जाहिरातीचे फलक तत्काळ हटविण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर फलकमुक्त झाला. काँग्रेसच्या वतीने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, यापुढील काळात शहरातील विविध प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याचे काळे म्हणाले.
..
सूचना फोटो आहे.