अखेर रस्ता झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:19 AM2021-04-11T04:19:57+5:302021-04-11T04:19:57+5:30
हा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील सात गावांच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जनभावनेचा मोठा रोष होता. वृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ ...
हा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील सात गावांच्या दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. जनभावनेचा मोठा रोष होता. वृद्धेश्वरचे संचालक कुशीनाथ बर्डे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश काजळे, बाळासाहेब बर्डे, बाबासाहेब बर्डे, शेवंताबाई बावणे, अशोक सुरासे यांच्यासह दोनशे ग्रामस्थांनी एकत्रितपणे बांधकाम विभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना गांभीर्य दाखवून दिले. बांधकाम अभियंत्यांनी तहसीलसह पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली. सोमवारी पोलीस बंदोबस्त मिळाला. बुधवारी दिवसभर जेसीबी यंत्राच्या मदतीने हा रस्ता पूर्ववत करण्यात आला.
बांधकाम विभागाचे अधिकारी वसंत बडे, महेश पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांनी पाठपुरावा केला. वरिष्ठ स्तरावरून अनुमती मिळताच रस्ता खुला करण्यात आला.
..........
हा भाग वादाचा
या जिल्हा मार्गाबाबत पाडळी हनुमान टाकळीच्या सीमेवर गेल्या १५ वर्षांपासून ठरावीक अंतराचा भाग वादात आहे. रस्ता नेमका ओढ्यातून की शेजारच्या जमिनीतून असा वाद सुरू आहे. मोजणीअभावी हद्द कायम न झाल्याने हा प्रश्न प्रलंबित आहे. आताही रस्ता खुला झाला. पण, मोजणीअभावी हद्द कायमचा प्रश्न अनुत्तरितच आहे. म्हसोबा मंदिर पुलापर्यंत पूर्वेकडून तर पश्चिमेकडून बावणे वस्तीपर्यंत रस्ता डांबरीकरण पूर्ण केला आहे. मधील वादातीत रस्त्याचे डांबरीकरण केव्हा होणार, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमोल गवळी, चारुदत्त वाघ यांनी केला आहे.