दोन महिन्यात ३५ लाखांची दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:22+5:302021-06-11T04:15:22+5:30

श्रीगोंदा : बेलवंडी पोलिसांनी दोन महिन्यांच्या कोरोना लाॅकडाऊन काळात ४ हजार ७३९ गुन्हे दाखल करून ...

A fine of Rs 35 lakh was recovered in two months | दोन महिन्यात ३५ लाखांची दंड वसुली

दोन महिन्यात ३५ लाखांची दंड वसुली

श्रीगोंदा : बेलवंडी पोलिसांनी दोन महिन्यांच्या कोरोना लाॅकडाऊन काळात ४ हजार ७३९ गुन्हे दाखल करून तब्बल ३४ लाख ८१ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी दिली. बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाकेबंदी, पेट्रोलिंग करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या तब्बल ४ हजार ७३९ जणांवर गुन्हे दाखल करत ३४ लाख ८१ हजार ४०० रुपये एवढा दंड वसूल केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन जाहीर करत विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून प्रत्येकी ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी ही दंडात्मक कारवाई केली. यामध्ये बेलवंडी पोलिसांनी नगर-पुणे रस्त्यावर गव्हाणेवाडी शिवारात नाकेबंदी केली होती. तेथून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला.

Web Title: A fine of Rs 35 lakh was recovered in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.