चौंडीतील अहिल्यादेवींच्या पुतळ्यासमोरील तुळ राशीच्या साखळीची मोडतोड : गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 03:34 PM2018-06-22T15:34:31+5:302018-06-22T15:35:24+5:30
मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून तसेच स्ट्रीट लाईटचे खांब वाकून तुळ राशीचे शिल्प असलेल्या तराजूचे साखळ्याचे नुकसान केले.
जामखेड : मंगळवारी (दि. १९ रोजी) रात्री आठ ते दि. २० रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोरील उद्यानातील मार्गदर्शक फलकाचे खांब तोडून झाडांना पाणी देण्यासाठी असलेल्या ठिबक सिंचनाचे कनेक्शन स्टॅण्ड मोडून तसेच स्ट्रीट लाईटचे खांब वाकून तुळ राशीचे शिल्प असलेल्या तराजूचे साखळ्याचे नुकसान केले.
याबाबत अण्णासाहेब डांगे ( वय ८२, संस्थापक अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान चौंडी, मुळ रा. इस्लामपूर जि. सांगली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक फौजदार विठ्ठल चव्हाण करित आहे.