वाकडी येथे विवाहितेस मारहाणप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 07:08 PM2018-02-14T19:08:21+5:302018-02-14T20:21:51+5:30

विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

An FIR has been lodged against four persons in the murder of a married woman at Wakadi | वाकडी येथे विवाहितेस मारहाणप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

वाकडी येथे विवाहितेस मारहाणप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

श्रीरामपूर : विवाहितेस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चुलत सासरे व अन्य तीन साथीदारांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मीना गणेश पारखे (वय ३०, वाकडी, ता.राहाता) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. संजय रावसाहेब पारखे, यमाजी रावसाहेब पारखे, बंडू गुलाब चितळकर, सोनाली गणेश पारखे (सर्व रा. वांगी, ता.श्रीरामपूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विवाहित महिला चार वर्षांपासून माहेरी राहते. सन २०११ मध्ये त्यांचा विवाह गणेश नानासाहेब पारखे यांच्याशी झाला. मात्र सासरच्या लोकांकडून आपला शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे, अशी तक्रार मीना यांनी केली आहे.
टाकळीभान-श्रीरामपूर रस्त्यावर ९ जानेवारीस आरोपींनी घटस्फोट देण्यासाठी धमकी देत बळजबरीने वाहनात बसविले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत ५० हजार रूपये व दागिने हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Web Title: An FIR has been lodged against four persons in the murder of a married woman at Wakadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.