Ahmednagar: कोपरगाव दुय्यम कारागृहात अडगळीला आग, ट्रेझरीचे स्टॅम्प पेपर वाचले
By सचिन धर्मापुरीकर | Published: October 9, 2023 01:47 PM2023-10-09T13:47:12+5:302023-10-09T13:47:29+5:30
Ahmednagar: अहमदनगर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम कारागृहाच्या एका खोलीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली.
- सचिन धर्मापुरीकर
अहमदनगर - शहरातील तहसील कार्यालय परिसरातील दुय्यम कारागृहाच्या एका खोलीत ठेवलेल्या अडगळीच्या सामानाला रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आग लागली. कारागृहाचे बांधकाम करायचे असल्याने येथील कैद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात आलेले आहे. त्यामुळे दुर्घटना टळली. तसेच वेळीच दक्षता घेतल्या गेल्याने जवळच असलेल्या ट्रेझरीच्या स्ट्राँग रुमला कुठलाही धोका निर्माण झाला नाही.
कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात दुय्यम कारागृह आहे. या कारागृहाचे बांधकाम करावयाचे असल्याने येथील कैद्यांना अन्य कारागृहांत हलविण्यात आले आहे. रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कारागृहाच्या एका खोलीत जाळ लागल्याचे अनिल वैरागळ, सिद्धार्थ वाघमारे (रा. टीळकनगर, कोपरगाव) यांच्या लक्षात आले. वैरागळ यांनी आत जाऊन पाहिले असते, जूने कपडे, अडगळीचे सामान याला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू आग आटोक्यात येत नव्हती. त्यानंतर तुरूंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांना माहिती देण्यात आली. ते घटनास्थळी पोहोचले, नगर परिषदेच्या अग्नीशमक बंबालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग आटोक्यात आली.
ज्या ठिकाणी आग लागली, तेथून काही फूटांवरच ट्रेझरी ऑफीसचे स्ट्राँग रुम आहे. आगी वाढली असती तर लाखो रूपयांच्या स्टॅम्प पेपरचे नुकसान झाले असते, या शिवाय कारागृहाच्या मागील बाजूस स्वस्त धान्याचे शासकिय गोदाम आहे. वेळीच दक्षता घेतल्याने व आग आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळल्याचे, बोलले जाते.