आगीमुळे चार एकर उस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 17:59 IST2021-02-13T17:59:07+5:302021-02-13T17:59:52+5:30
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे बल्लई नाला परिसरातील आंब्याच्या मळा येथे महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत प्रवाहमध्ये शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या थिणग्यामुळे ४ एकर उभा ऊस जळून खाक होऊन शेतमालकाचे मोठे नुकसान झाले.

आगीमुळे चार एकर उस खाक
श्रीरामपूर : तालुक्यातील टाकळीभान येथे बल्लई नाला परिसरातील आंब्याच्या मळा येथे महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत प्रवाहमध्ये शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या थिणग्यामुळे ४ एकर उभा ऊस जळून खाक होऊन शेतमालकाचे मोठे नुकसान झाले.
टाकळीभान बेलपिंपळगाव रस्त्यावर बलाई नाक्याजवळ जयश्री शैलेश मगर यांचे १० एकर ऊसाचे क्षेत्र आहे. ऊसास तोड सुरु असताना सोमवारी दुपारी विद्युत प्रवाहाचे तारामध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊसास आग लागली होती. दुपारची वेळी उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले.
आग लागल्याचे परिसरातील लोकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. धूर व जाळाचे लोळ सुरु असल्यामुळे जवळ जाणे अशक्य असतानाही लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.