१२ कोविड सेंटरला अग्निपंखकडून औषधांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:28+5:302021-05-09T04:21:28+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने श्रीगोंदा तालुक्यातील १२ कोविड सेंटरला ८० हजार किमतीच्या औषधी गोळ्या, ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने श्रीगोंदा तालुक्यातील १२ कोविड सेंटरला ८० हजार किमतीच्या औषधी गोळ्या, सॅनिटायझर, मास्कची भेट देण्यात आली.
श्रीगोंदा शहरातील शासकीय कोविड सेंटर, कर्मवीर भाऊराव पाटील ( कोळगाव), अजित पवार ( पिंपळगाव पिसा), शिवशंभो (घारगाव), श्री व्यंकनाथ (लोणी व्यंकनाथ), भैरवनाथ ( बेलवंडी), पद्मभूषण आण्णासाहेब हजारे ( देवदैठण ), भैरवनाथ (मढेवडगाव), सिद्धेश्वर (आढळगाव), चांडेश्वर (चांडगाव), संत शेख महंमद महाराज ( श्रीगोंदा), सिद्धेश्वर (लिंपणगाव), सुद्रिकेश्वर (पारगाव सुद्रिक), हंगेश्वर (चिंभळे) यांना ही मदत वाटप करण्यात आली.
ही मदत पांडुरंग खेतमाळीस, शिवप्रसाद उबाळे, मच्छिंद्र सुपेकर, शरद जमदाडे, राहुल कोठारी, प्रा.संजय लाकुडझोडे, उत्तम डाके, सतीश लगड, मिलिंद भोयटे, प्रशांत गोरे, गणेश डोईफोडे, मनोज जगताप, बापू ढवळे, अमोल गव्हाणे, रमजान हवालदार, सुनील गायकवाड, युवराज पवार, मधुकर काळाणे, बंडू खंडागळे, किसन वऱ्हाडे, विजय हरिहर, अविनाश निंभोरे, दीपक वाघमारे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.
---
०८ अग्निपंख
श्रीगोंदा येथील शासकीय कोविड सेंटरसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्याकडे अग्निपंख फाउंडेशनची मदत सुपुर्द करताना मच्छिंद्र सुपेकर, राहुल कोठारी.