जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:23 PM2018-08-15T12:23:51+5:302018-08-15T12:23:54+5:30

जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला

Firing in Jamkhed: ST carrier seriously injured | जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

जामखेडमध्ये गोळीबार : एस.टीचा वाहक गंभीर जखमी

जामखेड : जामखेड-बीड रस्त्यावर बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास जामखेड एसटी बसचा वाहकावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये वाहक सुग्रीव जायभाय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जामखेड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमीला नगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मागील सहा महिन्यात जामखेड शहरात झालेला तिसरा गोळीबार आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील सुग्रीव गहिनीनाथ जायभाय ( वय -४३, रा. जायभायवाडी सध्या राहणार - गोडाऊन गल्ली, जामखेड ) हे रात्री अडीच वाजता जामखेड ग्रामीण रुग्णालयात चालत आले. त्यावेळी जायभाय यांच्या मांडीतून रक्त येत होते. गोळीबारात जखमी झालेले सुग्रीव जायभाय जामखेड आगारात वाहक म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यात डॉ. पठाण यांच्या मांडीवर दिवसाढवळ्या गोळीबार झाला होता. त्यांच्यासह आणखी एक जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर २९ एप्रिल रोजी योगेश राळेभात व राकेश राळेभात यांच्यावर गोळीबार होऊन दोघे मृत्यू पावले होते. त्यानंतर बुधवार दि. १५ आॅगस्ट रोजी पहाटे अडीच वाजता सुग्रीव जायभाय यांच्यावर गोळीबार होऊन जखमी झाले आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जामखेड शहरसह तालुक्यात घबराटीचे वातावरण झाले आहे.

 

Web Title: Firing in Jamkhed: ST carrier seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.