दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 03:39 PM2024-03-03T15:39:46+5:302024-03-03T15:40:08+5:30

जामखेड (जि . अहमदनगर) : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे ...

Firing on trial on the grounds of filing a case a year and a half ago, case filed against two | दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

दीड वर्षापूर्वी गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून मुकादमावर गोळीबार, दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड (जि . अहमदनगर) : दीड वर्षांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरडाचे) येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांनाला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी फरार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न व आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत. 
    
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की घटनेतील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण (रा. गरडाचे पाटोदा ता. जामखेड) हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत. याच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे (रा.जामखेड) हा ऊसतोड मजुर कामाला होता. सदर मजुर लक्ष्मण काळे यास आर्थिक कारणावरून दिड वर्षांपुर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे (रा. पाटोदा गरडाचे) याने मारहाण केली होती. म्हणून दिड वर्षां पुर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधात तक्रार नोंदवली होती.

याचाच मनात राग धरून दि ३ मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी आबेद पठाण यांच्यावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एक गोळी आबेद पठाण यांच्या पायाला लागल्याने ते या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबार झाल्यावर आरोपी एका कलाकेंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन फरार झाला आहे. त्यामुळे  पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतले आहेत.

सदर घटनास्थळी तातडीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली असुन लवकरच आरोपीला पकडण्यात येईल अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुढील तपास सपोनि गौतम तायडे हे करत आहेत. 

दुहेरी हत्याकांडातील आरोपी

मुकादमावर गोळीबारातील आरोपी अक्षय ऊर्फ (चिंग्या) विश्वनाथ मोरे हा 2018 साली राळेभात बंधुच्या दुहेरी हत्याकांडातील त्यावेळी अल्पवयीन आरोपी होता व निर्दोष सुटला होता.  सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असुन त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Firing on trial on the grounds of filing a case a year and a half ago, case filed against two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.