कुळधरणमध्ये गोळीबार
By Admin | Published: October 9, 2016 12:38 AM2016-10-09T00:38:52+5:302016-10-09T01:06:19+5:30
कर्जत : साथ का सोडली? या कारणावरून शनिवारी सकाळी कुळधरण (ता. कर्जत) येथे दोन गटांत भांडणे होऊन बबन गजरमल यांना बेदम मारहाण करण्यात आली.
कर्जत : साथ का सोडली? या कारणावरून शनिवारी सकाळी कुळधरण (ता. कर्जत) येथे दोन गटांत भांडणे होऊन बबन गजरमल यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. मारहाण करणारांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत गजरमल यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गरजरमल हे कुळधरण बसस्थानक परिसरातील दुकानात कपडे घेत होते. तेव्हा सहा सात जणांनी तेथे येऊन ‘तू आमची साथ सोडून इतरांबरोबर का फिरतो’, असे सांगत अर्वाच्य भाषा वापरली. तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गजरमल यांना वायर, चैन, पट्टा, दगडाने बेदम मारहाण करण्यात आली.
यावेळी धाक दाखविण्यासाठी पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ,दमदाटी करून ते तेथून निघून गेले. ग्रामस्थांनी माझी सुटका केली, असे गजरमल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भाऊसाहेब सुपेकर, बंडू ऊर्फ प्रशांत औटी, राम सुपेकर, परशुराम आजबे, मयूर सुपेकर, चंगया सुपेकर यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे तपास करीत आहेत. सर्व आरोपी फरार आहेत.
या घटनेमुळे कुळधरण येथे मोठा तनाव निर्माण झाला होता. तसेच कर्जत पोलीस ठाण्यासमोर मोठी ग् ार्दी झाली होती. या घटनेतील जखमी बबन गजरमल यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(तालुका प्रतिनिधी)