संपत्तीच्या वादातून काष्टीत रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार; दोघे भाऊ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 12:42 PM2021-11-17T12:42:16+5:302021-11-17T12:42:40+5:30
श्रीगोंदा : काष्टी येथील संजीवनी हाॅस्पीटल मसमोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत दोघेही जखमी झाले आहेत. घटनास्थळास पोलिस निरीक्षक रामराव ढिकले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी भेट दिली.
समजलेली अधिक माहिती अशी की, मनोज मुनोत व डॉ. विजय मुनोत यांचा संपत्तीच्या वादातून वाद धुमसत होता.
बुधवारी मनोज मुनोत यांनी डॉ. विजय मुनोत यांच्या संजीवनी हाॅस्पीटलसमोर ट्रक लावली.
डॉ. विजय मुनोत यांनी मनोज मुनोत यांनी यांना विचारले, माझ्या दवाखन्यासमोर ट्रक का लावली ? त्याचे भांडणात रुपांतर झाले. सुरुवातीला मनोज याने डॉ. विजय मुनोत यांच्या डोक्यात पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. एक गोळी मनोज मुनोत याच्या मांडीत घुसली. मनोज मुनोत याला एक गोळी लागली. मनोज मुनोत याच्या मांडीत गोळी घुसली आहे. मनोज मुनोत याला उपचारासाठी दौंडला हलविण्यात आले आहे.