मुळा धरणातून पहिले आवर्तन १५ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:33+5:302020-12-26T04:17:33+5:30

मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी, तसेच बाष्पीभवन व अचल (मृत) साठा वगळता, 14 हजार 500 दशलक्ष ...

First cycle from Mula dam on 15th January | मुळा धरणातून पहिले आवर्तन १५ जानेवारीला

मुळा धरणातून पहिले आवर्तन १५ जानेवारीला

मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी, तसेच बाष्पीभवन व अचल (मृत) साठा वगळता, 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे. धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्यांद्वारे रबीत एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. उजव्या कालव्याचे प्रत्येक आवर्तन ४० दिवस चालेल. राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्‍यातील ३० हजार हेक्‍टरचे सिंचन होईल. उजव्या कालव्यातून रबीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी ९ हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल.

डाव्या कालव्याचे आवर्तन २० ते २५ दिवसांचे असेल. राहुरी तालुक्‍यातील तीन हजार हेक्‍टरचे सिंचन होईल. डाव्या कालव्यातून रबीसाठी ५०० दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल.

-

संभाव्य तारखा -

रबी हंगाम :

१५ जानेवारी ते २४ फेब्रुवारी २०२१

उन्हाळी हंगाम : १० मार्च ते १९ एप्रिल २०२१, मे ते १८ जून २०२१

Web Title: First cycle from Mula dam on 15th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.