सुंदर ग्राम पुरस्कारात खडांबे जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:03+5:302021-02-23T04:31:03+5:30

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्दसह सडे या गावात रस्ता काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारी, १०० टक्के गावे हागणदारीमुक्त, जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, स्मशानभूमीचे ...

First in Khadambe district in Sundar Gram Puraskar | सुंदर ग्राम पुरस्कारात खडांबे जिल्ह्यात प्रथम

सुंदर ग्राम पुरस्कारात खडांबे जिल्ह्यात प्रथम

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्दसह सडे या गावात रस्ता काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारी, १०० टक्के गावे हागणदारीमुक्त, जलयुक्त शिवार, वृक्षारोपण, स्मशानभूमीचे सुशोभिकरण, नियमित कर्ज भरणाऱ्यांना मोफत दळण आदी शासन स्तरावरील विविध योजना योग्य पद्धतीने राबविल्या. लोकसहभागातून विकास साधला आहे. याचीच शासनाने दखल घेऊन खडांबे खुर्द या गावास सन.२०१८-१९ या सालाचा जिल्हास्तरीय प्रथम तर २०२०-२१ वर्षातील सडे या गावाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अहमदनगर येथील माउली संकुल सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.

खडांबे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, उपसरपंच गणेश पारे, उज्ज्वल हरिश्चंद्रे, अनिता पवार, हिराबाई नन्नवरे, संजय कल्हापुरे, प्रभाकर हरिश्चंद्रे, भरत पवार, वैजीनाथ हरिश्चंद्रे, बाळासाहेब कल्हापुरे, एकनाथ कल्हापुरे, अतुल कदम, मारूती कुलट, जनार्दन मकासरे, बाळासाहेब साळे, नानासाहेब कदम, नानासाहेब दुधाडे, दीपक मकासरे, ग्रामसेवक राम कार्ले, तत्कालीन ग्रामसेविका उषा गहिरे, सडे ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत पानसंबळ, उपसरपंच अमोल धोंडे, बाळासाहेब लहारे, धीरज पानसंबळ, नवनाथ शिंदे , कोमल गणेश घोरपडे, कल्पना संदीप साळवे, सिंधुबाई अरुण फाटक, आशाबाई पवार, बिस्मिल्ला पठाण, उषाताई अरुण धामोरे, रावसाहेब नन्नवरे, गणेश घोरपडे, विक्रम फाटक, धनंजय पानसंबळ, कलीम पठाण, विनय गरुड, कृष्णा धोंडे, प्रभाकर दिवे, लक्ष्मण कनगरे, जालिंदर शिंदे, ग्रामसेवक महेश जंगम, तत्कालीन ग्रामसेविका वनिता कोहकडे, संभाजी निमसे, संजय गिर्हे, बाळासाहेब गागरे, किसन भिंगारदे, भाऊसाहेब राशीनकर, संजय डौले, रवींद्र लांबे, सचिन कल्हापुरे, संतोष राठोड, महेश जंगम, गणेश पाखरे, राजेंद्र बोठे, सुनील कोरडे, रोहिदास भोंदे, गोविंद गांधले, शिवाजी पल्हारे, अशोक खळेकर, मोहन परभाणे, मच्छिंद्र कटारनवरे उपस्थित होते.

Web Title: First in Khadambe district in Sundar Gram Puraskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.