राज्य नाट्य स्पर्धेत ‘मर्डरवाले कुलकर्णी’ नगर केंद्रात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:15 PM2017-11-30T13:15:34+5:302017-11-30T13:16:54+5:30
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून यंदा अमित खताळ लिखित व दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
अहमदनगर : ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून यंदा अमित खताळ लिखित व दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. तसेच दिग्ददर्शनात अमित खताळ यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.
नगर कला क्रीडा अकादमी देऊळगाव सिद्धी या संस्थेच्या ‘लास्ट स्टॉप’ या नाटकास व्दितीय तर अहमदनगर जिल्हा हौशी नाट्यसंघाच्या ‘स्लाईस आॅफ द लाईफ’ या नाटकास तृतीय क्रमांक मिळाला आहे. दिग्दर्शनात प्रथम पारितोषिक ‘मर्डरवाले कुलकर्णी’साठी अमित खताळ यास, ‘लास्ट स्टॉप’साठी काशिनाथ सुलाखे पाटील यांना व्दितीय पारितोषिक मिळाले. प्रकाशयोजनेसाठी प्रथम पारितोषिक प्रसाद बेडेकर (मर्डरवाले कुलकर्णी), व्दितीय पारितोषिक शेखर वाघ (आकाशपक्षी) यांना मिळाले. नेपथ्यात प्रथम पारितोषिक नाना मोरे (एक्झीट), तर व्दितीय पारितोषिक अवंती गोळे (लास्ट स्टॉप) यांना मिळाले. तर उत्कृष्ट अभिनायाची रौप्यपदके लढा नाटकासाठी सुफी सैय्यद तर लास्ट स्टॉप नाटकासाठी शोभना नांगरे- चांदणे यांनी पटकावली.
शीतल परदेशी (आकाशपक्षी), मनिषा सीता (लढा), हर्षदा भावसार (अतृप्त), अश्विनी अंचवले (चाहूल), विनोद वाघमारे (याचक), अमित रेखी (स्लाईस आॅफ द लाईफ), श्रेणीक शिंगवी (नाटकपक्षी) व प्रवीण कुलकर्र्णी (मर्डरवाले कुलकर्र्णी) यांना अभिनयासाठी गुणवत्ता पारितोषिके मिळाली.