पहिल्या टप्प्यात ५४० वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:36+5:302021-03-23T04:21:36+5:30

सुपा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वर्गखोल्यांसाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून पहिल्या टप्प्यात ४५० वर्गखोल्यांचे बांधकाम केले ...

In the first phase, 540 classrooms will be constructed | पहिल्या टप्प्यात ५४० वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

पहिल्या टप्प्यात ५४० वर्गखोल्यांचे होणार बांधकाम

सुपा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा वर्गखोल्यांसाठी ४५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून पहिल्या टप्प्यात ४५० वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.

पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांनी उपलब्ध करून दिलेल्या २५ लाख रुपये निधीतून बांधण्यात येणारे ग्रामसचिवालय, १२ लाख रुपये खर्च करून सभापती काशिनाथ दाते यांनी उपलब्ध केलेल्या निधीतील जवकमळा रस्त्याचे डांबरीकरण व लेंडी नदीवरील १२.४८ लाख रुपये खर्चाच्या बंधाऱ्याबरोबरच पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या निधीतून ३ लाख रुपयांच्या आरओ फिल्टर प्लँटचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

उपसरपंच बाबा जवक यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीचे सदस्य राहुल शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सेनेचे विभागप्रमुख आप्पा देशमुख, उपसरपंच बाबा जवक, सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, बंटी साबळे यांचीही भाषणे झाली.

यावेळी सरपंच प्रीती साबळे, उपसरपंच बाबा जवक, प्रियंका शिंदे, काका देशमुख, बंटी साबळे, कल्याण गाढवे, शरद ढगे, अनिल जवक, शरद सरोदे, संतोष सरोदे, अप्पा देशमुख, मोहन लोणकर, सुधीर खिलारी, राजू कुंकुलोळ आदी उपस्थित होते. प्रकाश गाढवे यांनी सूत्रसंचालन केले. शरद सरोदे यांनी आभार मानले.

Web Title: In the first phase, 540 classrooms will be constructed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.