रुईछत्तीसीतील कोरोनामुक्तीबाबतचे पहिले बक्षीस वाॅर्ड क्रमांक-४ ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:22 AM2021-05-21T04:22:24+5:302021-05-21T04:22:24+5:30
रुईछत्तीसी : रुईछत्तीसी (ता. नगर) येथे कोरोनामुक्तीबाबतचे पहिले बक्षीस वाॅर्ड क्रमांक चारला देण्यात आले. १५ मे पर्यंत वाॅर्ड कोरोनामुक्त ...
रुईछत्तीसी : रुईछत्तीसी (ता. नगर) येथे कोरोनामुक्तीबाबतचे पहिले बक्षीस वाॅर्ड क्रमांक चारला देण्यात आले. १५ मे पर्यंत वाॅर्ड कोरोनामुक्त ठेवणाऱ्या वाॅर्डला पहिले बक्षीस दिले जाणार होते. गावातील कोरोना योद्धांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे.
येथील जगन्नाथ बाबा संघ संचालित नोकरदारांनी गाव कोरोनामुक्त होण्यासाठी वॉर्डनिहाय बक्षीस जाहीर केले होते. त्याबाबतचे बक्षीस वितरण सर्व खासगी डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय कर्मचारी यांच्या साहाय्याने जाहीर करण्यात आले. गावातील सर्व ग्रामस्थ, डॉक्टर यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि गावची आजची परिस्थिती ९५ टक्के कोरोनामुक्तीकडे आहे. प्रथम क्रमांकाचे ११ हजारांचे बक्षीस वाॅर्ड क्र. चारला मिळाले. हे बक्षीस बाबासाहेब पर्वती पाडळकर यांनी दिले. द्वितीय क्रमांकाचे ७ हजार ५०१ रुपयांचे बक्षीस वाॅर्ड क्रमांक दोनला मिळाले. हे बक्षीस अशोक ज्ञानदेव जगदाळे यांनी दिले. वाॅर्ड क्रमांक एकने ५ हजार ५०१ रुपयांसह तृतीय क्रमांक पटकाविला. हे बक्षीस झुंबर श्रीपती भांबरे यांनी दिले. उत्तेजनार्थ चौथे बक्षीस वाॅर्ड क्रमांक तीनला मिळाले. जगन्नाथ बाबा शिक्षक बचत गटाने हे बक्षीस दिले.
कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन कोविडयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी,
सर्व अंगणवाडीसेविका,
सर्व आशा स्वयंसेविका, संदीप एकनाथ गोरे, देविदास पाराजी गोरे, अशोक हरिभाऊ गोरे, सागर अंबादास वाळके, डॉ. भिवसेन भागवत, सविता ससाणे, सागर दत्तात्रेय खाकाळ यांना कोरोनायाेद्धा म्हणून सन्मानित केले जाणार आहे. यापुढेही गावच्या सामाजिक कार्यात या समाजसेवी संघटनेचे कायम सहकार्य राहील, असे जगन्नाथ बाबा सहायता संघाचे अध्यक्ष जालिंदर खाकाळ यांनी सांगितले.