अहमदनगरमध्ये कोरोना योद्धा कर्मचाऱ्याला दिली पहिली लस, लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:49+5:302021-01-17T04:17:49+5:30

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ...

The first vaccine given to Corona Warrior personnel in Ahmednagar, vaccination started in the district | अहमदनगरमध्ये कोरोना योद्धा कर्मचाऱ्याला दिली पहिली लस, लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ

अहमदनगरमध्ये कोरोना योद्धा कर्मचाऱ्याला दिली पहिली लस, लसीकरणाला जिल्ह्यात प्रारंभ

कोरोना लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार शनिवारी ही मोहिम सुरू झाली. जिल्ह्यात एकूण १२ केंद्रांवर पहिल्या टप्प्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्यातील आठ ग्रामीण रुग्णालये आणि महानगरपालिका क्षेत्रातील ४ नागरी आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी, उपजिल्हा रुग्णालय कर्जत, शेवगाव ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय, राहाता ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ग्रामीण रुग्णालय, अकोले ग्रामीण रुग्णालय येथे लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर, महानगरपालिका क्षेत्रातील तोफखाना नागरी आरोग्य केंद्र, जिजामाता नागरी आरोग्य केंद्र, केडगाव नागरी आरोग्य केंद्र आणि नागापूर नागरी आरोग्य केंद्र येथे ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यात ३१ हजार १९६ आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंद पोर्टलवर करण्यात आली आहे. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात या १२ केंद्रांतर्गत येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यासाठी ३९ हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवशी १०० जणांना प्रत्येक केंद्रांवर लस दिली जाणार आहे.

लसीकरणासाठीचा प्रोटोकॉल ठरवून देण्यात आला आहे.

----------

सुरुवातीला पोर्टलवर नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर, त्यांना प्रतीक्षा कक्षात बसविण्यात आले. तेथून प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले, नंतर लस दिलेल्या कर्मचाऱ्यांना अर्धा तास विश्रांती घेण्यासाठी सांगितले गेले.

Web Title: The first vaccine given to Corona Warrior personnel in Ahmednagar, vaccination started in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.