राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील मच्छिमारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:16 PM2018-05-10T13:16:51+5:302018-05-10T13:23:27+5:30

मुळा धरणातील माशांवर विषप्रयोग या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाटबंधारे खात्याने राहुरी पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती मुळा धरण क्षेत्राचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. 

Fisheries in Mula dam in Rahuri taluka intervene from the office of Chief Minister | राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील मच्छिमारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

राहुरी तालुक्यातील मुळा धरणातील मच्छिमारीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल

ठळक मुद्दे जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेशपाटबंधारे खात्याने केली पोलीस संरक्षणाची मागणी

राहुरी : मुळा धरणातील माशांवर विषप्रयोग या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या वृत्ताची दखल घेण्यात आली असून, जिल्हा पोलीस प्रमुखांना कारवाईचा आदेश देण्यात आला आहे. बुधवारी दुपारी पाटबंधारे खात्याने राहुरी पोलीस स्टेशनला पत्र देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केल्याची माहिती मुळा धरण क्षेत्राचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. 
मुळा धरणामध्ये मध्यरात्री विषारी औषध टाकून मच्छिमारी होते. पाणी विषारी करणारे नेमके नेमके कोण आहेत, यादृष्टीने तपास सुरू आहे़ जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांनी बुधवारी दुपारी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना मोबाईलवरून चौकशी करून कारवाईचा आदेश दिला आहे.
मुंबई येथील ब्रीज फिशरीचे मोहमंद खान यांनी मुळा धरणातील माशाचा ठेका घेतला आहे़ ठेकेदार व मच्छिमारी करणारे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. विषारी औषधांमुळे मच्छिमारी केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ यासंदर्भात ठेकेदाराने मच्छिमारी करणाऱ्यांना मासेमारी जाळे पध्दतीने करावी, माशांवर विषप्रयोग करू नये, असा सज्जड इशारा दिला आहे़ त्यानंतर काही अवैध मच्छिमारांनी रात्रीच्या वेळी धरणात विष टाकून मच्छिमारी करण्याचा अघोरी प्रयोग केला आहे़ अघोरी मच्छिमारी करणाºयांनी मुळा धरणात असलेले कर्मचाºयांचे शेड उद्ध्वस्त केल्याचे समोर आले आहे़
मुळा धरणावर अवैध व्यवसाय करणाºयांनी अतिक्रमण केले आहे़ अयोग्य पद्धतीने मच्छिमारी होत असल्याचे आढळून आले आहे़ धरणाच्या काठावर घरे बांधून बेकायदेशीर मच्छिमारी करणा-यांवर पाटबंधारे खात्याने कारवाई करण्याची गरज आहे़ मुळानगर परिसरात कुणीही येऊन राहत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे़ धरण परिसरात येणाºया पर्यटकांनाही लुटमार करण्याचे प्रकार वाढल्याने संरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे़. मुळा पाटबंधारे विभागाकडे मनुष्यबळ कमी असल्याचे सांगितले जाते. अनेक कर्मचारी निवृत्त झालेले आहेत़ त्यामुळे धरणाच्या ५० किलोमीटर परिसरात संरक्षण करणे पाटबंधारे खात्याच्या आवाक्याबाहेर आहे़ पोलीस संरक्षण मागण्यात आले असले, तरी पोलिसांची संख्याही कमी आहे़ त्यामुळे विषारी पद्धतीने होणारी मच्छिमारी कशी रोखणार? हा कळीचा मुद्दा पुढे आला आहे़

Web Title: Fisheries in Mula dam in Rahuri taluka intervene from the office of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.