मच्छिमाराचा मुलगा बनला सिनेमाचा डायरेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 02:15 PM2019-09-22T14:15:39+5:302019-09-22T14:16:34+5:30
वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़
भाऊसाहेब येवले ।
राहुरी : वडिलांचा मच्छिमारीचा व्यवसाय. त्यामुळे जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेता आले़ टुरिंग टाक्या चालवयाला घेतल्या़ डिजिटल जमाना आल्याने टाक्या बंद पडल्या़ डिजिटल क्षेत्रात प्रवेश करतांना कल्पतरू फिल्म कंपनी काढली़ सध्या डिजिटलच्या जमान्यात २०० ते ३०० थिएटरला फिल्म रिलीज केले जात आहे़ शून्यातून भरारी घेणाºया राहुरी येथील फिल्म डायरेक्टरचे नाव राम परसैय्या़
डायरेक्टर राम परसैय्या यांनी वडिलोपार्जित मच्छिमारी न करता नवीन काहीतरी करून दाखवयाचे या हेतूने जीवनाचा प्रवास सुरू केला़ टुरिंग टॉकिजला पेट्या पुरविण्याचे काम सुरूवातीला केले़ टुरिंग टॉकिज डिजिटल जमान्यात बंद पडल्या़ काळाची पाऊले ओळखून राम परसैय्या यांनी डिजिटल क्षेत्रात प्रवेश केला़ एकामागून एक चित्रपट तयार केले़ आतापर्यंत ११ मराठी चित्रपट तयार केले़ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कलाकार आहेत़ परंतु त्यांना पुरेशा प्रमाणावर सिनेमात काम करण्याची संधी मिळत नाही़ त्यामुळे राम परसैय्या यांनी ग्रामीण कलाकारांना मराठी चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली़ चित्रपट तयार करतांना टीमवर्क सांभाळणे महत्त्वाचे असते़ त्यादृष्टीकोनातून डायरेक्टर म्हणून राम परसैय्या यांचे कौशल्य पणाला लागते़ चित्रपट निर्मितीनंतर रिलीज करणे, सॅटेलाईट विकणे, सरकारचे अनुदान प्राप्त करणे ही कामे करावी लागतात़ चित्रपटाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गोरेगाव, पुणे, भोर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी चित्रपटाचे शुटींग केले जाते़ पावसाळ्यात चित्रपटाच्या शुटींगला अर्धविराम दिला जातो़ डिसेंबरमध्ये राम परसैय्या यांनी नवीन चित्रपटांचे नियोजन केले आहे़ परसैय्या यांची चित्रपट डबिंग करून चीनमध्ये गेले आहेत़ बाहेरच्या देशात चित्रपट दाखविले जातात़ परसैय्या यांनी हिंदी चित्रपटाचीही निर्मिती केलेली आहे़
भविष्य काळात बदलत्या तंत्र-ज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना नावीन्यपूर्ण चित्रपट देण्याचा प्रयत्न आहे़ त्यादृष्टीकोनातून ग्रामीण भागातील कलाकारांचे आॅडिशन घेतले जाते़ मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड सातत्याने होत असतांना दिसत आहे़ मात्र चांगला चित्रपट काढला तर त्याला प्रेक्षक डोक्यावर घेतात, असे दिग्दर्शक राम परसैया यांनी सांगितले.