लांडग्यांच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार; शेवगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 12:56 PM2020-05-06T12:56:40+5:302020-05-06T12:57:33+5:30
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील सुकळी शिवारात रहात असलेले शेतकरी सुलेमान रसूल शेख यांच्या पत्र्याच्या शेडमधील बांधून ठेवलेल्या पाच शेळ्यांचा लांडग्यांनी मंगळवारी (दि.५मे) पहाटेच्या सुमारास फडशा पाडला. यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.
सुलेमान रसूल शेख हे सोमवारी रात्री पत्र्याच्या शेडमध्ये शेळ्या बांधून बालमटाकळी येथे काही कामानिमित्त आले होते. यावेळी पहाटेच्या सुमारास लोखंडी तारेची जाळी उचकाटून लांडग्यानी पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश करत बांधून ठेवलेल्या लहान, मोठ्या अशा पाच शेळ्या ठार केल्या. गावातून शेतामध्ये गेल्यानंतर ही घटना त्यांच्या नजरेस पडली. सदरील घटनेची माहिती मिळताच पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.आर.जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.डि.एम.गटकळ तसेच वनविभागाचे वनपाल पी.बी. वेताळ, वनरक्षक एस. आर. बुधवंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकाºयांनी मृत शेळ्यांची उत्तरीय तपासणी करून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे. या शेळ्यांची शेख यांना भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.